गोंडवाना की राजमाता राणी हिराई आत्राम इतिहास मराठी आणि हिंदी मध्ये.rani-hirai-atram

गोंडवाना की राजमाता राणी हिराई आत्राम इतिहास मराठी आणि हिंदी मध्ये ।
   Rani-Hirai-Atram

Information of gondwana

गोंडवाना की राजमाता राणी हिराई आत्राम★

कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व असे विविधांगी गुण असणारी चंद्रपूर नगरीची निर्माती राजमाता राणी हिराई यांच्या  दंडोस सेवा जोहार !

◆गोंडवाना राजमाता राणी हिराई

■राजमाता राणी हिराईची विकासदृष्टी होती प्रेरणादायी !

■राजा बिरशाहच्या प्रेमात राणी हिराईने बांधले स्मारक !

जवळपास चार लाख लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर शहराला साडेअकरा किलोमीटरच्या परकोटाने वेढले आहे. या शहराला गोंडकालीन इतिहास आहे. इतिहासाच्या या पानापासून आजही अनेकजण अनभिज्ञ आहेत. मात्र, आता या इतिहासाची ओळख हळूहळू हेरिटेज वॉक या नव्या ट्रेण्डने बाहेर पडू लागली आहे. राणी हिराई यांचे पती गोंडराजे बिरशाह यांना पुत्र नव्हता. केवळ मुलगी होती. 

    देवगडच्या राजघराण्यातील एक राजपुत्र दर्गशहा यांना मुलगी दिली. एकदा बिरशाहच्या मुलीस दुर्गशहा याने अपमानीत करून माहेरी पाठविले. तिने आईला हा प्रकार सांगितला. तेव्हा राणी हिराई क्रोधीत झाल्या. तिने राजाला आपल्या मुलीच्या अपमानाचा सूड घेण्यास सांगितले.

      राणी हिराई हिनेसुद्धा माता महाकालीला नवस केला. या लढाईत विजयी झाल्यास तुला दुर्गशहाचे शीर आणून वाहीन. या युद्धात शेवटच्या क्षणी राजा बिरशहा विजयी झाले. दुर्गशहाचे शीर धडावेगळे केले गेले. हा विजय आपल्यास महाकालीच्या कृपेने मिळाला म्हणून राणी हिराई दुर्गशहाचे शीर देवीला मोठा समारंभ करून वाहिले, असा उल्लेख अ. जा. राजूरकर यांच्या चंद्रपूरच्या इतिहासात उल्लेखित आहे. 

      राजास राणी हिराईपासून पुत्र नव्हता म्हणून त्यांनी दुसरे लग्न केले. मोठ्या समारंभाने लग्नाची वरात निघाली. राजा बिरशहाने हिरामण नावाच्या सैनिकाला अंगरक्षक केले होते. राजाची वरात गोंडराजाच्या राजवाड्यात आल्यानंतरच अंगरक्षकाने राजा बीरशहाला ठार केले. वयाच्या 28 व्यावर्षी राजाचे निधन झाले. काही काळानंतर राणी हिराईने राजा बिरशहा याच्या प्रेमात समाधीस्थळ बांधले. ते आजही आहे. कुण्या राणीने राजाच्या प्रेमात बांधलेली ही वास्तू एकमेव असावी. राणी हिराईने समाधीस्थळाच्या परिसरात अनेक वास्तू बांधल्या. या वास्तू चंद्रपूरसह महाराष्ट्रातील पर्यटकांना भुरळ घालत आहेत. 

■बांधकामे देताहेत कार्यकाळाची साक्ष.

राणी हिराईने आपल्या कार्यकाळात अनेक मंदिरासह बरीच बांधकामे केली. आजही ही बांधकामे राणी हिराईच्या कार्यकाळाची साक्ष पटवून देत आहेत. महाकाली मंदिराचे जुने देऊळ पाडून नवीन मोठे मंदिराचे बांधकाम केले. यासोबत एकवीरा मंदिर, बालाजी वॉर्डातील गणपती मंदिर, बाबूपेठमधील महादेव मंदिर, समाधी वॉर्डातील राम मंदिर, वैरागड येथील गोरजाईचे मंदिर, घुटकाळा तलाव, माकर्डेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार आदी बांधकामे करून आपले नाव चंद्रपूरच्या इतिहासात अजरामर केले. 

■ राणी हिराईच्या काळात महाकाली यात्रा.

    राणीनेच चैत्र महिन्यात पौर्णिमेस महाकालीची यात्रा सुरू केली. ती आजपण सुरू आहे. बीरशहाच्या मृत्यूनंतर राणी हिराईने चंदनखेडा येथील दीर अर्थात बिरशहाचा चुलत भाऊ गोंविदशहा यांच्या तीन वर्षांच्या मुलास दत्तक घेतले. मुलाचे नाव रामशहा असे ठेवले. दिवाण बापूजी वैद्य यांच्या मदतीने तिने कारभार बघितला. 1704 ते 1719 पर्यंत म्हणजे रामशहा सज्ञान होईपर्यंत राज्यकारभार चालविला.

 राणी हिराईने चंद्रपुरात देवी महाकालीचे भव्य व सुंदर मंदिर बांधले. सोबतच, महाकाली यात्रा सुरु केली. ती यात्रा आजतागायत सुरु आहे. कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व असे विविधांगी गुण राणी हिराई यांच्या अंगी होते.

    धडाडी आणि बुद्धी चातुर्याने चंद्रपूरचा राज्यकारभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळला. त्यांची कारकिर्द भरीव आणि महिलांना अभिमान वाटावा अशी की राणी लक्ष्मीबाई आणि अहिल्याबाई होळकर यांच्यासारखाच त्यांचा गौरवाने उल्लेख व्हावा 

  बल्लारपूरचा भाग सुमारे ६०० वर्षे गोंडराजांच्या अधिपत्याखाली होता. या कालावधीत २३ राजे होऊन गेलेत. त्यात राणी हिराई या एकमेव महिला शासक होत्या. त्यांची कारकिर्द केवळ १५ वर्षांची पण, या अल्पशा काळात युद्धात स्वत: उतरुन त्यांना शत्रुशी मुकाबला करावा लागला होता. राणीचे माहेर मध्य प्रदेशातील होशंगाबाद जवळचे! वडिल सरदार असल्याने राजकारण आणि युद्धाचे धडे त्यांना बालपणापासूनच मिळाले होते. त्यांचा विवाह चंद्रपुरातील बिरशहाशी झाला. वडिलाच्या निधनानंतर बिरशाह गादीवर बसला. परंतु थोड्याच दिवसानंतर एकाने विश्वासघात करुन त्यांची हत्या केली. या दाम्पत्याला वारसा नसल्याने हिराईने आपल्या नात्यातील रामशहा या सहा वर्षीय मुलाला दत्तक घेऊन गादीवर बसविले आणि आत्मविश्वासाने राज्यकारभार बघू लागली. कान्होजी भोसले यांनी १७१० ला चंद्रपूरवर स्वारी केली. गोंड आणि पठाण सैन्य घेऊन रात्री मैदानात उतरली. तेथे कान्होजीचा पराभव झाला. यानंतर सुलतानजी निंबाळकर याने चंद्रपूरवर स्वारी केली. चंद्रपूरची आर्थिक स्थिती वाईट होती. त्यामुळे राणीने युद्ध न करता तह केला. परंतु, दुसऱ्याच वर्षी निंबाळकरला चंद्रपूर सोडून देण्याला भाग पाडले. राणीला जय-पराजयाला सामोरे जावे लागले होते. परंतु, हिंमत हरली नाही. लोककल्याणकारी कामे करून राणीने ठसा उमठविला. ऐतिहासिक रामाळा तलाव बांधले. राजाची देखणी समाधी व महाकाली मंदिर बांधले. राज्यावर औरंगजेबाचा अंमल होता. तरीही तिने गोवंश हत्याबंदी केली. रामशहा हा लहान असल्याने त्याचा मातेसारखा सांभाळ करून युद्ध व राजकारणाचे प्रशिक्षण दिले. राजा म्हणून उत्तमरित्या संस्कारीत केले. राणी हिराई धार्मिक वृत्तीची होती. माता महाकालीवर तिची प्रगाढ श्रद्धा होती....अन् मंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण केलेराणी हिराईने चंद्रपूरला महाकाली देवीचे लहान मंदिर होते. बिरशहा हा एका युद्धात शंभूशी लढत असताना त्याचा पराभव नजिक दिसून येत होता. अशाप्रसंगी राणी हिराईने देवीची आराधना करीत पतीला युद्धात विजय मिळवून दिला. मोठे मंदिर बांधण्याचे मनाशी ठरविले. बिरशहाने युद्ध जिंकले व राणीने माता महाकालीचे मंदिर बांधले. यात्रा भरविणे सुरु केले. शेकडो वर्षांपासून ही यात्रा भरत आहे. महाकाली देवीच्या महात्म्याची प्रसिद्धी नांदेडपर्यंत पोहोचली. तेथील भािवक यात्रेदरम्यान दर्शनासाठी येऊ लागले. पोतराजे आणि भाविकांमुळे यात्रेला गर्दी उसळते. ४०-५० वर्र्षांपूर्वी मंदिराभोवतीचा बराचसा भाग मोकळा होता. त्यामुळे रात्री भरपूर जागा मिळायची. मात्र, आज घरे झाल्यामुळे यात्रेकरिता कमी जागा उरली आहे. पण यात्रेचे महत्त्व कमी झाले नाही.राणी हिराईचा पुतळा उभारा राणी हिराईने केलेल्या लोककल्याणकारी कार्याची दखल इतिहासाने घेतली आहे. त्यांच्या कार्यकाळातील विविध बांधकाम आजही साक्ष म्हणून उभे आहे. त्यांच्या कार्याचा म्हणावा तसा गौरव झाला नाही. त्यांच तेजस्वी इतिहास लोकांना अद्याप योग्यरित्या कळला नाही. महाकाली मंदिरात राणी हिराईचे चित्र लावण्यात आले आहे. यात्रेदरम्यान अंचलेश्वर गेटजवळ राणीचे चित्र लावले जातात. पण, हे पुरेसे नाही. 

#हिराई आत्राम

चांदागड ची महाकाली            Gondwana culture   click here

Igondi

 

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.