रावण हा गोंड राजाच होता !
दि .२७ / ९ / ८१ च्या बहुजन नायक मध्ये चांदूर रेल्वेचे प्रा.न.ह वानखेडे यांनी रावण हा गोंड राजा होता हे विधान ऐतिहासिक दृष्ट्या चूक असल्याचा आक्षेप घेतला आहे . पण हा आक्षेपच कसा चूक आहे , हे सांगण्याचा येथे लेखकाचा प्रयत्न आहे . वानखेडे साहेबांनी इतिहास फक्त व्यक्तिचाच असतो एवढेच गृहीत धरलेले आहे . पण इतिहास हा विचारांचाही असतो आणि हे प्राचीन विचार साहित्यात आपले स्वरूप उघडे करीत असतात . त्यामुळे पुराण किंवा प्राचीन महाकाव्यातील ऐतिहासिकतेला डावलताच येत नाही . ही महाकाव्ये . पुराण किंवा मनुस्मृती आहेत म्हणूनच आपण असे हमखास म्हणू शकतो की , निष्पाप शंबुकाचा रामाने खून केला अन् तशा शेकडो शूद्रांना आर्यांनी जमीनदोस्त केले , शेकडो वर्षापासून शूद्रांना ज्ञानार्जनास बंदी घातली आणि शूद्रांसाठीच एकतर्फी शिक्षा ठेवल्या हा सर्व सामाजिक , धार्मिक , सांस्कृतिक परंपरेचा इतिहास महाकाव्ये ही पुराणातच उपलब्ध होतात . म्हणून रामायण आदि महाकाव्यातील ऐतिहासिकता डावलणे उचित होत नाही . खरे म्हणजे इतिहासातील कल्पकतेमुळेच राष्ट्राला सोयीनुसार उजाळा मिळत असतो . म्हणूनच सोळाव्या शतकातील बंडखोर म्हणून ओळखला गेलेला शिवाजी हा स्वतंत्र महाराष्ट्राचा प्रेरणादायी शूर छत्रपती ठरला . त्याच प्रमाणे हिंदूंनी म्लेंच्छ आणि समाजद्रोही ठरविलेला औरंगजेब हा मुसलमानांचा उत्कृष्ठ धर्म प्रसारक व शासक सिद्ध झाला . म्हणजे गोष्टीतील ऐतिहासीकता किंवा अनैतिहासिकता ही संबंधीत व्यक्तीच्या भावना वाढीवरही अवलंबून असते, असे दिसून येते . या संदर्भात प्राचार्य भाऊ भालेराव म्हणतात , इतिहासकारांनी यासाठी आपल्या सोयीनुरूप या भावनावाढीची व्यवस्थाही अत्यंत जागरूकतेने केलेली आहे . मग नाना फडणीसाच्या बायका नि रखेल्या यांची यादीही ऐतिहासिक दप्तरातून कशी गहाळ करायची नि तात्या टोपेला किंवा लक्ष्मीबाईला कसे नि किती मोठे बनवायचे इत्यादी बाबी या इतिहास लेखकांच्या हातचा केवळ मळच
रावण ,लंकेश, दशानन, लंकापती यांच्या दहा डोक्यांबद्दल ची विस्तृत माहिती
व्यंकटेश आत्राम कृत दोन क्रांतीवीर या संशोधनात्मक ग्रंथावरील प्राचार्य भाऊ भालेराव यांची सत्यवादी प्रस्तावना शिवशक्ती ६.११.६८ . या प्रदीप मेश्राम इतिहासाची साधने वर ११.११.८१ च्या बहुजन नायक मध्ये लिहितात त्या प्रमाणे- इतिहास लिहून ठेवण्याची पद्धत भारतीयांमध्ये प्राचीन काळी नव्हती इतिहास हा शिलालेख ताम्रपात्र , आणि इत्यादी उपलब्ध साधनांनी कालांतरानेही थोडा बहुत सांगता येतो . पण धार्मिक किंवा सांस्कृतीक इतिहासाचे तसे नाही. इतिहास हा खालील तिन साधनांनी जाणून घेता येतो .
गोंडवाणा की नई जाणकारी पानेके लीये APP डाऊनलोड करे .गोंडवाणा APP डाऊनलोड कैसे करे . igondi apk
( १ ) पुरातत्वीय साधने
( २ ) परदेशी लेखकांची माहिती आणि
( ३ ) वाङ्मयीन साधने .
अर्थात वाङ्मयीन साधनांना ऐतिहासिक मूल्य असतात ही बाब निक्षून लक्षात घेतली पाहिजे . म्हणजे रामायण हे महाकाव्य मानणे हे जेवढे जेवढे खरे तेवढेच इतिहास जाणून घेण्याचे वाङ्मयीन साधन म्हणून त्याचे महत्व मानणे हे ही खरे . जसे रामायणात वर्णिलेली सुवर्णलंका अतिरंजीत , अवास्तव स्वरूपाची दर्शविलेली असेल परंतु लंका नामक कोणते गावच नव्हते असे मात्र म्हणता येत नाही . या संदर्भात जगप्रसिद्ध भारतीय पुरातत्ववेत्ता डॉ . हंसमुख सांकलिया यांचे प्रतिपादन त्यांच्याच शब्दात येथे विचारात घेऊ या . ते का म्हणतात सोनपूर नजीक ४ कि.मि.अंतरावरील नायमुंडा नामक गाव म्हणजेच रावणाची प्राचीन लंका होय त्या गावाने पुरातत्वत्त्यांची संपूर्ण शक्ति एकवटून घेतली आहे . आणि त्यांना नव्या दिशेने विचार करायला भाग पाडले आहे . सोनपूर ही लंका असण्याबाबत लोक मला आश्चर्याने विचारतात की ते कसे शक्य आहे , परंतु वस्तुस्थिती अशी आहे की , साहित्य वाङ्मयाच्या सपुष्टी व्यतिरिक्तही पुरातत्वीय आधार एकाहून एक सरस आणि सबल उपलब्ध होत आहेत . पुनः हा काही एक किंवा दोन वर्षाचा निष्कर्ष नाही . रामायणाच्या ऐतिहासा - किते संबंधीच्या अभ्यासात मी पूर्ण २० वर्षे घालविली आहेत . १५ वर्षाच्या अभ्यासानंतर लाखो रूपये खर्च करून जी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली ती म्हणजे रामायणाची इंद्राणाहील जवळ ' होय . रामायण वर्णीत सालवृक्षे पूर्वमध्य प्रदेश व पश्चिम ओरीसा मध्ये वैपुल्याने आजही आढळतात . ४० वर्षापूर्वी परमेश्वर यांनी जबलपूर नजिकच्या इंद्राणाहील जवळ लंका स्थित असल्याचे सांगितले होते . त्याच दिशेने संशोधन करतांना मला १ ९ ०८ सालचे एक ताम्रपत्र ओरिसात मिळाले . त्यात सोनपूरच्या पश्चिमेस लंका असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे . त्याचा अर्थ स्वगृ लंका असाच होतो . इसवी सनाच्या १० व्या किंवा १२ व्या शतकातील या ताम्रपत्रात पश्चिम लंकेच्या नावाचा उल्लेख होता . हीच एक प्रथम वेळ होय की , भारताच्या इतिहासात लिखीत आलेखांमध्ये लंकेच्या जागेचे स्पष्टपणे विवरण मिळालेले आहे . आणि त्याचे स्थळ शोधतांना तिळमात्र त्रास झाला नाही . अजूनही या जागेला प्राक्क लंका असेच लोक म्हणतात . तेथील आदिवासी लोक हनुमानाची पूजा करीत नाहीत . येथे हा संकेत मिळतो की , राक्षसाची मूळ भूमी हीच असावी . मध्यप्रदेश आणि ओरिसातील गोंड लोक तर स्वत:ला रावणाचे वंशज मानतात . त्यांच्या स्त्रिया रावणाची गीत वर्णने गातात . त्याची वर्ष यात्रा मेघनाद ' यात्रा म्हणून भरविली जाते . असाच एक ताम्रपत्र बस्तर मध्येही मिळाला . त्यातही असेच लिहीले आहे की , दंडकारण्य निकटवर्ती अर्थात स्वर्णपूर लंका या वरून माझ्या पुढे सोनपूरच्या प्राचीनत्वा संबंधी सहाजिकच प्रश्न उपस्थित झाले . पुष्टीकरणार्थ फोर्टीफिकेशनची आवश्यकता निर्माण झाली . कारण रामायणाच्या लंका वर्णनात किल्ल्यांची वर्णने आहेत . हे शक्य आहे की ,त्यात कवीने अतिशयोक्ती केलेली आहे . तरी सुद्धा
इदं दुर्गाहि कान्ताराम
मृग राक्षस सेवितम् । अख्यकांड १४.३४
इ . किती समर्पक वर्णने आहेत , लेखक
कल्पना करतांना कवीपुढे काही नमुना प्रारूप तर असेलच कल्पनासुद्धा सत्याच्या आधारावरच केली जाते . शेवटी ताड बनविण्यास तीळ तर पाहिजेच ना .
मी आपल्या विद्यार्थी डॉ . मराठे आणि त्या क्षेत्रामधिल जाणकार आर.वाय . दुंडप्पा यांचे स्वाधीन तेथील संशोधनाचे कार्य सोपविले , आणि काय आश्चर्य ! त्यांना तेथे काळ्या लाल मातीची भांडी , दगडी अवजारे जे पाषाण युगातील आहेत आणि किल्ला खिंडाराचे अवशेष मिळाले . काही छिद्रीत मुद्राही मिळाल्या . परिक्षण केल्यावर हे कळून आले की , त्या विशेष वस्तु १८०० वर्षाच्या जुन्या पुराण्या आहेत . त्यातील निष्कर्षही असे निघाले की , १२०२ वर्षापूर्वीची रावणाची स्वर्णमय लंका ती हीच होय . डॉ . हंसमुख सांकलिया - क्या सोनेकी लंका उडीसा मे थी , धर्मयुग ४-१० ऑक्टोंबर ८१.
महाकाव्यापासून तो पुरातत्व शास्त्रापर्यंत आपण वरिल प्रमाणे केलेल्या प्रवासातील ऐतिहासिक मूल्ये गृहीत धरण्यास पुरेशी आहेत , असे वाटते . आणि आता रावण हा गोंड राजा होता हे समजायला सुकर जाते .
कमल हेताबल म्हणतात -
राम आणि रावणाचा या देशात सनातन इतिहास आहे . दोघांचीही पूजा होते . दोघांना नवस कबूल केले जातात . तामीळनाडू मध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत . परंतु रावणाची सर्वांत मोठी मूर्ती ही मध्यप्रदेशात मंदसौर येथेच गोंडवाण्यातच आहे . जी अंदाजे १५ मिटर उंच आहे .
( १ ) जी. रामदास-
( Man in India part v . )
( iii ) Aboriginal names in the Ramayana
( Journal of Bihar & Orisa Research) Society . भाग -११ )
( २ ) रावबहादूर हिरालाल तदेव झाक मेमोरियल व्हॉल्यूम पृ १५१-६१
( ३ ) रसेल आणि हिरालाल -तदेव - १ ९ १८
( ४ ) रामकृष्णदास - राम बनवासका भूगोल - नागरी प्रचारिणी पत्रिका
( ५ ) जे . सी . घोष - I. H. Q. खंड ५. १ ९ ३० पृ.३३५-५६
( ६ ) कामिल बुल्के - रामकथा १ ९ ६२
( ७ ) वा.वि. मिराशी स्टडीज इन इंडोलॉजी अँड रामायण साईको .१ ९ ६१
( ८ ) हंसमुख सांकलिया - आर्कियालॉजी अँड रामायण - साईको १ ९ ७३
( ९ ) व्ही . डब्लू . करमबेलकर - तदेव - पृ २०१ ते २०९
( १० ) डॉ . हिरालाल शुक्ल - लंका की खोज .
- गोंडवाना संस्कृती मध्ये सोळा ढेंमसा आठरा वाजा कोण कोणते आहेत
- गोंडी(कोया) पूनेम दर्शन - पारी कुपार लिंगो
या व्यतिरिक्तही बरीच मंडळी या संदर्भात अभ्यासमग्न होती व आहे . त्यांचीही रावण संबंधी हीच धारणा आहे . हे ऐतिहासिक साधने आणि संशोधनाच्या बाबतीत परंतु प्रत्यक्षामध्ये गोंड लोकांच्या शेकडो वर्षाच्या परंपरेमध्ये सुद्धा काय दिसून येते ते पाहून तर वस्तूस्थिती डावलताच येऊ शकत नाही . रामायणादि पोथी पुराण न वाचता , न अभ्यासता अगदी प्राचीन काळापासून गोंड लोक रावणाची उपासना करतात . त्यास आपला मूळ राजा मानतात , दैवतही मानतात . राव , रावूळ , राऊड , रावदादा इत्यादि नावांचे प्रचलन त्या समाजात सर्वत्र आहे . राबूळचे संस्कृत रूप ' रावण ' असे झालेले आहे . गोंडात अहिरावूड , महिरावूड , दोंदल्या रावूड इत्यादि देव असून रामायणातील अहिरावण महिरावणाशी ते सादृश्य पावतात .
कमल हेतावल - रावण की सबसे लंबी प्रतिमा . युगधर्म - ४-१० आक्टोंबर १ ९ ८१ वरील विधानास मूर्ती वैज्ञानीक शास्त्राचाही आधार मिळाला . त्याहीपुढे धार्मिक , सांस्कृतिक दृष्ट्या वरील विधान तपासले तर रावण हा गोंड राजा होता या विधानात पर्णाशाने ऐतिहासिकता दिसून येते . गोंड सम्राट संग्रामशहा तर स्वत:ला रावणाचा पौलास्त्यवंशी समजत असे . असे त्याच्या मुद्रांवरून कळते . राम हे नाम किंवा पात्र पूर्णतयां आर्य लोकांचे प्रतिनिधीत्व करते . या उलट रावण हे नाम किंवा पात्र पूर्णतया आर्यपूर्व द्रविडीयन गोंडीयनांचे प्रतिनिधीत्व करते . आर्य आणि अनार्य आदिवासींच्या संस्कृतीची वर्णने रामायणामध्ये तशीच ठेऊन त्यांची प्रातिनिधिक मुख्य पात्रे वाल्मिकीने बदलविली असती आणि त्यांचे ऐवजी जी कोणती पर्यायी नामे त्या त्या संस्कृतीची द्योतकच राहिली असती , रावण ऐवजी पर्यायी नामाचा पुरूष हा गोंड राजा ठरला असता रामाचा पर्यायी पुरूष आर्यस्वामी ठरलाअसता , ही कल्पनेच्या कक्षेतीलच बाब नव्हे तर इतिहासाच्याही कक्षेतील बाब आहे . गौतम बुद्ध हा ऐतिहासिक पुरूष मानवजातीची दु:खे दूर करणारे तत्वज्ञान सांगितल्याने मानव जातीचा चाहता झाला तेच तत्वज्ञान गौतमाऐवजी कोणत्याही नामाने ओळखल्या गेले असते , तरी जगातील मानव जातीने त्यांच्या प्रचलित नामाचीच पूज्यता ठेवली अगर मानली असती . गौतम नामाशी काहीही कर्तव्य राहिले नसते . तेव्हा रावणाच्या पर्यायी नामाचा उपयोग केल्याने सुद्धा त्यातील ऐतिहासिकतेमध्ये मुळीच बाधा निर्माण झाली नसती हे लक्षात येईल .
रावण हा गोंड राजा होता या विधानाचे समर्थन करणारी खालील तज्ञमंडळी आणि त्यांचे शोधप्रबंध लक्षात घेतल्यावर तर यात शंका उरणार नाही असा विश्वास वाटतो .
( i ) Indian Historical Quarterly 1930
( ii ) Aboriginal Tribes in the Ramayana .
गोंडातील राव किंवा शवूळ हा लिंगरूप सूर्यराजा समजण्यात येतो . त्याची लोक प्रतिमा मोहाच्या वृक्षावर ठेवली जाते . ज्याप्रमाणे सुर्य हा आकाशात असतो . तसे रावणाचे दहा शीर हे नवग्रहांची मालिका धारण करणाऱ्या सुर्याशी तादात्म्ये पावतात . आदित्यं वर्णाभ्या कुंडलेभ्या विभूषित: असे रामायणातही त्याचे वर्णन मिळते .
रावणा विषयी गोंडलोकात जडलेल्या श्रद्धांना रामायण हे कारणीभूत नसून रावण हा गोंड वंशपरंपरेत प्रत्यक्षात होवून गेला , हेच मुख्य कारण होय . ही वस्तुस्थिती असल्याने भारताच्या भूमिवर रावण प्रत्यक्षात झालेला असो किंवा धर्म संस्कृतीच्या काव्य , कथा , व्यथांनी विचार प्रवाहात मानला गेलेला असो , रावण हा गोंड राजा होता असे मानणे क्रमप्राप्त ठरते .
#Raja-Ravan
0 टिप्पणियाँ
Please do not enter any spam link in the comment box.