गोंड लोकांची कल्पना आहे नाटनोर मेड्याल म्हणजे मारोती नामक देवता होय-koya pen

गोंड लोकांची कल्पना आहे नाटनोर मेड्याल म्हणजे मारोती नामक देवता होय

मारोती हा देव कोण्या धर्माचा आहे

हिंदु धर्मात मारोती म्हणजे रामाचा सेवक व ब्रम्हचारी असल्याचे सांगतात व तशी शिकवणुक हि सर्वानाच मिळालेली आहे.व प्रत्येक गावात मारोतीचे देऊळ असते व ते रामदास स्वामी पासुन प्रचलित झाल्याचे सांगितले जाते.

खरे पाहिले तर मारोती हा देव गोंडी संस्कृती मध्ये अतिप्राचीन असा समजला जातो.तो वृक्षोत्पन्न वायुरुप मानला जातो. जो वृक्षापासुन उत्पन्न होतो व वहन करतो तो मारोती.

गोंड लोकांची मारोती नामक देवता

मारोती या शब्दात मरा+वोती असे गोंडी शब्द आहेत. मरा या गोंडी शब्दाचा अर्थ वृक्ष असा होतो.वोती म्हणजे वहाणे,वहन करणे.मरा हा गोंडी शब्द झाड आणि मानवी शरीर या दोन्ही साठी वापरण्यात येतो तेव्हा आपल्या लक्षात येते.मानवी शरिराचे संचालन करणारे जे दैवत ते मारोती होय.तसेच वायुतत्व आणि वृक्षतत्व मिळून जी एक देवता होते ती गोंड लोकांची मारोती नामक देवता होय.जसे मरा +वोती म्हणजे वृक्ष+वात (किंवा वारा)अशी फोड करुन अर्थ सांगितला.गोंडी भाषेत वोम म्हणजे नेणे या वरून वहन करणे या क्रियापदापासुन मारोती शब्दाची उत्पत्ती झाली आहे हे कळुन येईल. वारा जोराने वाहतो म्हणून झाडे झुडपे पडतात, हालतात म्हणून वारा उत्पन्न होतो. अशी गोंड लोकांची कल्पना आहे.एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर वायु उड्डाण करणार्‍या वानर नामक प्राण्याला गोंड लोक मारोतीचे प्रतीक मानतात. म्हणून मारोती या देवाची प्रतिमा वृक्षाकपीच्या स्वरुपात व्यक्त केली जाते.

👉हे  पण माहिती घ्या तुम्हाला नकी आवढेल

नाटनोर मेड्याल म्हणजे काय

गोंडाच्या संस्कृती मध्ये मारोती ब्रम्हचारी मानण्यात येत नाही,तर त्याचे उलट ती देवता म्हणजे सुदृढ प्रजाजननाची आद्यदेवता होय असे मानले जाते.म्हणुन नवरी नवरदेवाला मारोतीच्या दर्शनाला नेन्याची प्रथा आहे.भीमल पेनची दर्शन हिंदु धर्मात गणपती हा आध्य पूजनाचा अधिकारी मानण्यात येतो.पण गोंड लोक सर्व देवांच्या अगोदर नाटनोर मेड्याल म्हणजे गावचा स्वामी म्हणुन मारोती ची पुजा करतात गांव पुजा.

≻जय सेवा संकलन:- लक्ष्मण कनाके 7387299066 ≺

(संदर्भ ग्रंथ पे.तिरु व्यकटेश आत्राम यांचे गोंडी संस्कृतिचे संदर्भ)

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ