रावण ,लंकेश, दशानन, लंकापती यांच्या दहा डोक्यांबद्दल ची विस्तृत माहिती Raven

रावण ,लंकेश, दशानन, लंकापती यांच्या दहा डोक्यांबद्दल ची विस्तृत माहिती Raven


रावण ,लंकेश, दशानन, लंकापती यांच्या दहा डोक्यांबद्दल ची विस्तृत माहिती

 जय रावण 
 Please Read carefully  ⇐   

खूप जास्त प्रश्नचें वाक्य दिले आहे ,त्याचात प्रश्नार्थिक चिन्हे न वापरता कोमा वापरण्यात आला आहे.प्रोबलाम येत असल्याने वापरले नाही. समजून घ्यावा .

💻आज आपण राजा रावण ,लंकेश, दशानन, लंकापती यांच्या दहा डोक्यांबद्दल ची विस्तृत माहिती घेवु ती खालील प्रमाणे मि सांगण्याचा प्रयत्न करत आहे,या मध्ये महान गत सम्राट महाबली आणी रावण यांच्या संवादातुन मला जे समजल ते मि माझ्या समस्त सगाजनांच्या ज्ञानात भर पडावी व राजा रावणा विषयी च्या दहा डोक्यांची (दहा तलांग विसा भुजांग)कल्पना यावी या मागचा निव्वळ हेतु आहे.जय सेव जय गोंडवाना 🙏 Ravan real history

गत सम्राट महाबली

Table of content1

रावणा तुझ भविष्य उज्वल आहे.माझी भंग पावलेली स्वप्न पुन्हा नव्याने जोडू पाहणारा कुणी तरुण मि आजवर पाहिला नाही. गरिब बिचार्‍या असुरांना विजयाकडे आणी शाश्वत किर्तीकडे नेणारा कुणी आजवर समोर आला नाही, हे रावणा चातुर्य आणी सहसंवेदना अंगी बाळगुन त्या सार्‍यांच नेतृत्व कर.लयाला गेलेल आपल साम्राज्य आणी विस्मरणात गेलेली संस्कृती ह्यांची उभारणी तु नव्याने तु करू शकतोस,त्यांच्या स्वप्नांमध्ये तु रंग भरू शकतोस.तूझ्या नेतृत्वाखाली अतिशय पराक्रमी असुर सेनानी देवांचा पराभव करायला सज्ज झाले आहेत,तु देवांच्या नगरीचा ऱ्हास करतांना अशी दृश्य मला दिसत आहे.हे रावणा मि तुला दहा पाठ देत आहे.ते विसरु नकोस विचार करणाऱ्या नऊ मस्तकाच विसर्जन कर आणी त्या दहा पैकी सर्वात महत्त्वाच असलेल मन तेवढ ठामपणे अस्तीत्वात राहिल पाहिजे ,तुला मिळालेल ज्ञान हे तुझ्या तपस्येचं फळ आहे, तुझ्या नऊ मस्तकाच विसर्जन हा सर्वश्रेष्ठ त्याग असणार आहे. ती नऊ मस्तक (शिर) खालील प्रमाणे आहेत.

1)राग किंवा संताप

राग किंवा संताप ही सर्वात हिन भावना आहे, त्यामुळे बुध्दीवर मळभ दाटुन येतं,आपण मुढपणे कृती करु लागतो, तारतम्य विसरतो, डोळ्यावर झडप ओढुन घेतो, विचार बाजुला ठेवुन केवळ शारीरिक स्तरावर वावरतो, त्यातून अस झालं तर आपल्याला दीर्घकालीन अपयशाला सामोर जावं लागतं म्हणुनच राग आणी संताप याची किड मनाला लागु देऊ नका, हे शिर विसर्जित केल पाहिज

2)गर्व

गर्व हि घातक भावना आहे, ह्या गर्वातुन उद्दामपणाची निर्मिती होते. सारासार विचार विसरला जातो. आपण चुकिचा दृष्टिकोन बाळगु लागतो शत्रुला कमी लेखुन स्वतः बद्दलच्या भ्रामक कल्पनामध्ये रमु लागतो म्हणून गर्व शिर विसर्जित केले पाहिजे.त्रिशूल मार्ग

3)ईर्षा किंवा मत्सर

हि देखअत्यंत्य विषारी भावना आहे, तिच्यावर विजय मिळवणं हे मानवी जन्मामधल सर्वाधिक कठीण साध्य आहे अस मि म्हणेन. ईर्षा निर्माण झाली की, त्या पाठोपाठ दुसर्‍या च राज्य,संपती,पत्नी आणि कीर्ती ह्यांची हाव निर्माण होते,ह्या एका नेपायी किती युध्दं झाली,किती रक्तपात झाला,किती अश्रू वाहिले ह्याची गणती करणंदेखील अशक्य आहे. म्हणून ईर्षा किंवा मत्यर शिर विसर्जित केले पाहिजे.

4)व5)सुख आणी दुःख

सुख व दुःख ह्या दोन भावना दिवस आणि रात्रीप्रमाणेच शाश्वत आहेत, विचारीई आणि बुद्धीमान व्यक्ती ह्या भावनांच्या आहारी न जाता समतोलपणे कार्यरत राहते. सुख आणि दुःख ह्या मुलभूत भावना नसुन आपल्या विचाराच प्रतिमास्वरूप आहेत.आपण जे पाहतो, ऐकतो आणि करतो त्यावर आधारित आपला दृष्टिकोन तयार होतो, त्या संदर्भात घडणारी आपली क्रिया कृती म्हणजे ह्या भावना. केवळ योध्दयानेच समतोलपणा बाळगला पाहिजे अस नाही, उलट, सामान्यापासुन असामान्यांपर्यंत प्रत्येकामध्ये समतोलवृती जागवली गेली पाहिजे, तिच्या अभावी आपण युध्दभुमिवर मृतासारखे ठरतो म्हणून सुख दुःख हे शिर विसर्जित केले पाहिजे.

6)भीती

भिती ही निव्वळ भावना नसुन तो एक घातक रोग आहे.केवळ नेत्याकडून त्याची लागण अनुयायांना होते, असं नसुन अनुयायांमुळेदेखील नेत्यांना भिती ग्रासु शकते,.युद्धामध्ये अनेक माणसं मारली जातात,त्याच्या मागे भिती हे महत्वाचंं कारण आहे, एखाद्या योद्धयाला कशाची भिती वाटावी मृत्युची परंतू मृत्यू तर सगळीकडेच असतो म्हणजे मग जखमांची भीती वाटते का, महत्वाच काय आहे, तुमच्या शरीरातून सांडणार रक्त की विजयामृत ,विचार करा. विचार करण्यामुळे अशा शंकाच निरसन होईल म्हणून भीती शिर विसर्जित केले पाहिजे.

7)स्वार्थ

स्वार्था ईतकी दुसरी कुठलीच बाब निंदनीय नाही. जो माणूस निव्वळ स्वतः चा विचार करतो तो सर्वाधिक दुर्दैवी म्हणायचा.मुळात आपण जन्माला का येतो,अन्न खाऊन माजण्यासाठी, पुन्हा पुन्हा प्रजनन करुन डुकरांसारखी पिल्लावळ जन्माला घालण्यासाठी, ह्या सुंदर धरित्रीला आपल्यातील मलाने घाण करण्यासाठ, मरणानंतर आपली कोणाला आठवण राहणार नाही अशा प्रकारे जगून संपण्यासाठी,गडद अंधारात चाचपडणाऱ्या आपल्या गरीब रयतेसाठी आपण जर प्रकाशाचा लहानसा किरण देखील निर्माण करू शकनार नसू,तर आपल्या जिवनाला काही अर्थ नाही तेव्हा रावणा स्वर्थीपनाच्या ह्या भावनेचा संपुर्ण त्याग कर हि भावना तिरस्करणीय आहे, हे मनावर ठामपणे बिंबवून घे म्हणून स्वार्थी शिर विसर्जित केले पाहिजे.

8)प्रेम

प्रेम ही एक शृंखला आहे, तुम्हीच निर्माण केलेल्या आभासांशी ती तुम्हाला जखडून ठेवते.योध्दयाने केवळ आणी केवळ यशावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यश हा एकच धर्म असला पाहिजे.तुमचे प्रजाजन,पालक,बायका-मुल, बंधु-भगीनी, आणि ईश्वर ह्यांच्या प्रती असलेल कर्तव्य पुर्णपणे पार पाडावी, परंतू कुणावरही, कधीही प्रेम करू नये. कारण,प्रेम तुम्हाला दुर्बल करतं. ज्या क्षणी जय आणि पराजय ह्यांच्यामध्ये निव्वळ तसुभर अंतर असत त्याक्षणी प्रेमाबरोबर येणाऱ्या अदृश्य बंधनामुळे तुम्ही अपयशाच्या खाईत लोटले जाता म्हणुनच प्रेमापासून सावध रहा व प्रेम शिर विसर्जित केले पाहिजे.

9)महत्वाकांक्षा

रावणा, तुझ्या नजरेतील तीव्र महत्वाकांक्षा मला दिसते आहे, परंतू अविवेक करु नकोस,जिवनात खऱ्या अर्थाने जे तुझ आहे तेवढंच मिळवण्याचा प्रयत्न कर, प्रत्येकाच्या आयुष्याला स्वतःची गती असते,तिला अवरोध करू नकोस, ध्येय बाळग आणि ध्येयपुर्तीसाठी कृती कर, परंतू ते करत असतांना जमिनीवरचे पाय सुटू देऊ नकोस, कुठलीही कृती करण्याआधी विचार कर, विचार कर म्हणून महत्वाकांक्षा शिर विसर्जित केले पाहिजे.

10)मन(बुध्दी)

ह्या सर्वामध्ये जपण्यासारखी असलेली एकमेव बाब म्हणजे आपले मन.गुरू,ग्रंथ आणि जिवन या त्रयींकडून मिळालेल ज्ञान मनाव्दारे टिपलं जात, ह्याचंच रूपांतर प्रज्ञेत होत, ही प्रज्ञा तुला जोपासायची आहे. जगतांना प्रत्येक क्षणी मनाला सकारात्मक आणि नवनविन विचार पुरवायचे आहेत, त्यामुळे तुझी दृष्टी स्वच्छ होईल, कृतीना बल लाभेल आणि परिणामांना आकार मिळेल.ह्या सगळ्यामुळे तू कमीत कमी चुका करशील. ज्या काही थोड्यापार चूका तुझ्या हातुन होतील,त्यातुन तू नव्याने तू खुप काही शिकशील .

राजा रावण

Table of content 2

महाराज तुम्ही सांगीतलेले विचार अतिशय उदत्त आहेत; परंतु तुम्ही अशक्याची आस धरत आहात.मला सांगायला खेद वाटतो आहे की, तुम्ही ज्या नऊ डोकी👺 म्हणत आहात त्या नऊ भावनांचा त्याग हा यश मिळविण्यासाठी अवास्तव आहे अस मला वाटतं. तुम्ही केलेल्या अध्यापनातून मला निर्विवादपणे ज्ञानप्राप्ती झाली आहे; परंतु माझी स्वतःची वेगळी मतं आहेत आणि ती कायम तशीच राहणार आहेत. हा माझा उध्दटपणा आहे असा विचार न करता कृपा करुन माझं बोलणं पुर्णपणे ऐकुण घ्या 🙏

1)राग किंवा संताप

महाराज, तुम्ही रागा बद्दल बोललात.मला मान्य आहे की, रागाला चुकीची दिशा दिली तर त्यामुळे नुकसान होत; परंतु राग हि जीवनाची मूलभूत भावना नाही का, एकेकाळी बलाढ्य असलेल्या आणि भूतलावर सर्वश्रेष्ठ संस्कृतीची स्थापना करणार्‍या असुर जमातीची जी काही दुरावस्था झाली आहे ती पाहून मला राग येणं स्वाभाविक नाही का, तसा राग नाही आला तर मी ह्या जमातिचा सुपुत्र असण्याचा दावा कसा करू, देव राजे आणि त्यांच्या प्रभावाखाली आलेले असुर हस्तक ह्यांनी लादलेल्या अमानवी अटींमुळे मी स्वतः चा संताप होऊ ध्यायचा नाही हे कसं शक्य आहे, विस्मरणात गेलेल्या असुर कला, उद्ध्वस्त झालेला असुर धर्म, भंग केली गेलेली असुर मंदिर,नष्ट केलेली असुर साम्राज्य आणि देव राजांपुढे लोटांगण घालत स्वतः ला वीर म्हणून घेणारे क्षुद्र ह्यांना पाहुन माझा संताप होणं स्वाभाविक नाही का, महाराज, मला सांगा की, असुरांची होणारी मानहानी पाहुन माझ्या मनात नेमकी कोणती भावना भावना प्रबळ झाली पाहिजे, माझ्या विचारांना चेतना देऊन मला सकारात्मक कृती करायला प्रवृत्त करण्यासाठी रागाच्या व्यतिरीक्त कोणत्या भावनेचा उपयोग होणार आहे, स्वामी मला क्षमा करा; पण राग धारण करणांर मस्तक, हे भावनिक राग शिर मी कधीही त्यागणार नाही.🙏

2)गर्व

गर्व किंवा अभिमान ह्यांचा तिरस्कार का करायचा, मला माझ्या लोकांचा, जमातीचा,संस्कृतीचा,भाषेचा,कलेचा आणि संगीताचा अभिमान आहे. माझ्यात जी अचाट शक्ती आणि यश मिळवायची इच्छाशक्ती आहे तिचा मला गर्व आहे. एखाद्या माणसाने सतत लिन रहावं, अन्नासाठी याचना करावी किंवा दारिद्रयात खितपत पडाव,अशा अनेक गोष्टी ब्राम्हणांकडून सांगितल्या जातात, त्यावर माझा यत्किंचितही विश्वास नाही. ते जे सांगतात त्यातील कुठलीही बाब उपयोजनात आणत नाहीत. मी जर यश मिळवण्यासाठी आयुषात प्रयत्न केले असतील तर अभिमान वाटण्याचा, मिळालेल्या संपन्नतेचा उपभोग घेण्याचा, मला पूर्णपणे अधिकार आहे गतकाळाच्या राजे-महाराजांनी भव्य मंदिरांची आणि नगरींची निर्मिती का केली, धर्म आणि बंधुभावाच्या नावाखाली दानशूर लोकांनी भरभरून औदार्य का दाखवल आहे, त्यातुन त्यांचा गर्व आणि अभिमान प्रकट होतो ना, वरकरणी नम्र वाटणारे लोकं बहुतांशी दांभिक असतात. खरोखरच लीन होण्याइतकं ज्ञान फार कमी जणांनी प्राप्त केलेल असतं. गर्व आणि अभिमान ही यशाच्या पाठोपाठ येणारी भावना आहे.खर सांगायच तर यशाच सर्वश्रेष्ठ फल म्हणजे गर्व. हे गर्व-शिर मी कस काय त्यागू🙏

3)ईर्षा किंवा मत्सर

मानवतेला चेतना देणारी सर्वाधिक प्रभावी भावना म्हणजे ईर्षा. अन्यथा साम्राज्यांनी एकमेकांशी स्पर्धा का केली असती, राजांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे, वर्चस्व प्रस्थापि करण्याचे प्रयत्न हे ईर्षेतुनच निर्माण होतात. ईर्षेमुळे प्रगतीला चालना मिळते. आयुशा ही जिवन जगायला प्रेरित करते. अन्न, वस्र,निवारा आणि मैथुन ह्या जिवनाच्या मुलभुत गरजा आहेत हे जरी खरं असलं तरी आपल महत्व प्रस्थापित करण्याची तिव्र कामना ही त्यांच्या खालोखाल महत्वाची आहे. मुळात, अन्नवस्रादी गरजादेखील ईर्षेतुन निर्माण होतात. जीवनातल ईर्षेचं स्थान नाकारणं म्हणजे मानवाच्या मूलभूत अंत:प्रवृतीला नकार देण आहे. मला क्षमा करा महाराज; परंतू ईर्षा -शिर त्यागणं माझ्यासाठी अव्यवहार्य आहे 🙏

4)सुख व 5)दुख

सुख दुःखामध्ये समतोल असला पाहिजे ह्याबद्दल तुम्ही बोलला होतात.असं शक्य तरी आहे का, माझे प्रियजन ह्या जगाचा निरोप घेतील तेव्हा मि शांत राहू शकणार आहे का, रडणं नाकारू शकणार आहे का , सौख्याची जाणीव स्वतः ला होऊ न द्यायच मी ठरवलं तर माझ काय होईल, सुर्योदयाचं सौंदर्य, लहान बाळाचं निरागस हसु, संगीताचे स्वर ह्या लहानसहान सौख्याच्या क्षणांचा आनंदच मी घेवु शकणार नसेल तर हे जिवन जगण्यात अर्थ तरी काय, म्हणून सुख दुःख हे शिर मि कसा त्यागू🙏

6)भिती

माणुस असो वा पशु, भीती ही आत्यंतिक महत्वाची अंत:प्रेरणा आहे आणि तिच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी तुम्ही मला सांगत आहात.स्वामी, मी घाबरलो आहे हे मान्य करण्याची भीती मला वाटत नाही.मला अनेक बाबींच भय वाटत वाटत. मी भित्रा नाही;पण माझ्या मनाच्या कोपर्‍यात भिती नक्कीच जागृत आहे.मला मृत्युची भीती वाटते वाटते. 'आम्ही मृत्युला घाबरत नाही ,' असा दावा करणार्‍यांचीसुध्दा मला भिती वाटते. असे लोक मुर्ख तरी असतात किंवा आत्यंतिक नीच; त्या मुर्खपणापायी ते ईत्तरांचा मृत्यू ओढवून आणतात किंवा मग ईत्तरांच्या तिरस्कारापायी त्यांचा निचपणा अधिक तीव्र होतो. क्रमशअनेक बाबी गमावण्याची मला भिती वाटते.कदाचित त्यांच काही मोल नसेलही;परंतू घाम गाळुन आणि रक्त सांडून जर मि त्या प्राप्त केल्या असतील, तर माझ्या दृष्टीने त्या अमुल्य असतील. माझे प्रियजन आजारी पडतील,युध्दामध्ये माझे बंधू आणि एकनिष्ठ सहकारी प्राण गमावतील,जोरदार पावसामध्ये खवळलेल्या समुद्राच्या लाटा माझ्या माता भगिनींना ओढून नेतील याची मला भिती आहे. प्रत्येक श्वसागणिक मी मृत्यूच्या दिशेने पाऊल टाकतो आहे. मात्र,भीतीचं अस्तित्व नाकारण्याईतकी तिची भिती मला वाटत नाही. जीवनात सामोऱ्या येणार्‍या संकटांना तोंड देण्याची हिम्मत माझ्यामध्ये निर्माण होते आणि टिकून राहते ती केवळ माझ्या अंतरंगात असलेल्या भीतीमुळे. ही भीतीच आहे जी मला ईश्वराला आणि स्वतः ला जाणून घ्यायला साहाय्यकारी ठरते.हे भिती-शिर त्यागण्याचा विचारदेखील मी करू शकत नाही

7)स्वार्थ

तुम्ही म्हणता की, स्वार्थ ही तळागाळातील भावना आहे;परंतू आपण लक्षात घ्यायला पाहिजे की, हे गुणवैशिष्टय महात्वाकांक्षेचा पाया आहे. त्यामुळे च तर आज जगभर महानगरं उदयाला येवू शकली आहेत. अत्यंत उच्च प्रतीचा अहंकार आणि ह्या जगावर वर्चस्व गाजविण्याची तीव्र कामना नसेल, तर जीवनात कुणी कस यशस्वी होऊ शकेल,माझ्या नजरेस एखादी रमणी पडते, दिमाखदार वास्तु मला दिसते, एखादं टुमदार ग्राम, झळझळणांर रत्न,वैभवशाली साम्राज्य मी पाहतो तेव्हा माझा आत्मा प्रेरित होतो. ह्या जगात असलेल्या सर्व देखण्या वास्तू ह्या केवळ आणि केवळ माझ्याच होऊन राहिल्या पाहिजेत ह्याची आस माझ्या मनाला लागते.महाराज,ह्या भावनेचा र्‍हास करण्यासाठी तुम्ही सुचवत आहात.माझ्या अज्ञानाबद्दल मला क्षमा करा ;परंतु तुम्ही जे बलाढ्य साम्राज्य उभारलं त्याच्या मुळाशी स्वार्थ नव्हता अस तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगू शकाल का,तुम्ही याचक होवून जगला नाहीत, ह्या संपुर्ण जगाचे सम्राट होण्यासाठी तुम्ही अथक परिश्रम केलेत. स्वार्थाच्या भावनेनं तुम्हाला उद्युक्त केल नव्हत तर तुम्ही अनेकानेक युध्दामध्ये हजारो योध्दयाना कंठस्नान घालण्याला प्रेरित का झालात,देवांच्या विरूध्द लढणाऱ्या सेनेचं नेतृत्व का केलत, तुमच्या पुढे एकच ध्येय होत;तुमच्यासाठी,तुमच्या कुळासाठी,तुमच्या जमातीसाठी तुम्हाला लौकिक प्राप्त करायचा होता -ईथे तुमच्या हा शब्द आत्यंतिक महत्वाचा आहे. तुम्ही जे प्राप्त केलत ते आणि त्याहुन कितीतरी अधिक प्राप्त करण्याची माझी इच्छा आहे. त्या करता माझी संभावना 'सर्वाधिक स्वार्थी 'अशी जरी होणार असेल, तरी हा धोका पत्करायला मी पुर्णतया तयार आहे आणी म्हणुनच मी 'स्वार्थ शिर' त्यागणार नाही. 🙏

8)प्रेम

प्रेमाच्या भावनेला तुम्ही क्षुल्लक समजता ही खेदाची बाब आहे. प्रेम हि सर्वश्रेष्ठ भावना आहे. तिच्याशिवाय काहीही अस्तित्वात येऊ शकत नाही.बालकाप्रती मातेला वाटणाऱ्या प्रेमाइतकं शुद्ध आणि चैतन्यदायी दुसर कहीही नाही.आपल्या प्रियकर किंवा प्रेयसी बरोबर राहण्याची आत्यंतिक निकड एखाद्याला जाणवत नसेल, तर आपले बंधु भगीणी,जन्मदाता,नऊ मास उदरात धारण करणारी आणि स्वतः चा तक्तावर आणि दुधावर पोषण करणारी जन्मदात्री, तुमच्या सहवासात असणारे आणि अनेक लहान-मोठ्या क्षणांना स्मरणीय करणारे तुमचे सखे सोबती, तुमच्याबरोबर जीवनाची वाटचाल करणारी तुमची पत्नी, तुमच्या बिजाला धारण करुन तुम्हाला पुत्रप्राप्ती करुन देणारी जन्मदा,तुमचा वंश सातत्याने पुढे नेणारी तुमची मुलं ह्या सगळ्यांची आवशक्ता जर आपल्याला वाटत नसेल,तर मग हे जीवन जगाव तरी कशासाठी, आपलं राष्ट्र, जमात,भाषा,ईश्वर आणि अशा असंख्य बाबी कदाचित क्षुल्लक वाटू शकतात;परंतु त्या अमुल्य असतात आणि म्हणूनच त्यांचं जतन केल जातं. त्यांचा लौकिक जपण्यासाठी, त्यांना अबाधित राखण्यासाठी युध्द होतात, रक्ताचे पाट वाहतात. प्रेमापोटी आजवर असंख्यानी प्राणत्याग केला आहे.जोवर हे जग अस्तित्वात आहे, तोवर प्रेमासाठी असाच त्याग होत राहील.ज्या ज्या गोष्टींचा मी उल्लेख केला आहे त्यांच्यावर मी नेहमीच प्रेम करत राहेन;परंतु सर्वप्रथम मी स्वतः वर प्रेम करेन.कारण,मीच जर नसलो तर, प्रेमाच्या विविध रुपांना माझ्या दृष्टीने काय अर्थ उरतो, मी प्रेम करतो म्हणून मी अस्तित्वात आहे आणि मी अस्तित्वात आहे म्हणून मी प्रेम करतो -स्वतः वर प्रेम करतो. हे प्रेम-शिर मी कस त्यागाणार, 🙏

9)महत्वाकांक्षा

ही तर प्रगतीची गुरूकिल्ली आहे. महत्वाकांक्षेशिवाय माणसं निव्वळ शिकारी म्हणून भटकले असते.ना चाकाचा शोध लागला असता,ना रथांचा,ना घोडागाड्यांचा,भव्य मंदिराची, प्रसादाची आणि नगरांची उभारणी झाली नसती. समुद्राच्या अथांग पाण्यावर डौलाने विहरणारी गलबतं दिसली नसती, आपल्या प्रत्येकाच जीवन भरधाव पुढे नेणारा अश्व म्हणजे महत्वाकांक्षा. एखाद्या लहानशा ज्योतीच्या स्वरुपात काही महामानवांच्या अंतरंगात तेवणारी महत्वाकांक्षा नसती, तर प्रगती इतक्या प्रचंड वेगाने कशी झाली असती, स्वतःच्या क्षमताबद्दल माणसाला जो आत्मविश्वास वाटतो त्यामागे गर्वाची भावना असते;तिची सांगड महात्वाकांक्षेशी घातल्यामुळे प्रगती होते. दूसरा आपल्यापेक्षा पुढे जाईल ह्या भावनेने निर्माण झालेली ईर्षा प्रत्येकाला कठोर परिश्रम करण्यासाठी तत्पर ठेवते; सौख्याच्या शोधासाठी वाटचाल करतांना महत्वाकांक्षा सतत विस्तारात जाते;दुःखाच्या भितीने रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही आणि त्यातुनच माणुस कष्ट सोसायला तयार होतो; अपयशाची भिती वाटु लागली की माणुस अधिक दक्ष होतो, ईश्वराला घाबरुन राहतो; स्वार्थामुळे तो आपल कुटुंब,नगरी, कुळ,जमात आणि राष्ट्राशी प्रामाणिक राहतो;ह्या सर्वांचा सरसकट परिणाम म्हणून तो अधिक कठोर परिश्रम करू लागतो. जीवनाप्रती आणि असंख्य गोष्टीप्रती असलेल प्रेम हे त्याला आयुष्याच मूळ जाणवून देतं.ज्या सर्व भावनांचा त्याग मी करावा,असं तुम्ही सुचवत आहात त्या भावनांनी महत्वाकांक्षेच्या ज्या ज्योतीला धगधगत ठेवलं आहे, अस असतांना 'महत्वाकांक्षा - शिर मी कस त्यागू,

10)मन(बुध्दी)

आदरणीय सम्राट मी माझ्या मनातले विचार व्यक्त करतो आहे म्हणून खेद करु नका. तुम्ही सुचवल आहे की, बूध्दी हे एकमेम शिर वापरण्यायोग्य आहे. बुध्दीच महत्व मी अमान्य करत नाही ;परंतू गतकाळाच्या घडामोडींकडे दृष्टिक्षेप टाकला असता आपल्याला दिसुन येत की, इत्तर नऊ भावनांच्या अनुपस्थितीमध्ये बुध्दी निव्वळ निष्प्राण सांगडा ठरते. महर्षींनी ऋषींनी विविध संस्कृती उदयाला आणल्या नाहीत. स्वतःच्या भावनांना उघडपणे मान्य करुन सहजतेने व्यक्त करणाऱ्या असामान्य माणसांनी नगरांची आणि संस्कृतीची उभारणी केली, अरण्यात वास करून राहणार्‍या कुठल्याही भिक्षूकाने नगरं वसवली नाहीत, भव्य मंदिर उभारण्यासाठी कुठल्याही ऋषींनी कठोर निश्चय केला नाही. व्यापारउदिम वाढविण्यासाठी मोठाली गलबतं बांधन्याची तीव्र इच्छा कुठल्याही ब्राम्हणाला झाली नाही; त्याउलट ज्यांच्या धमन्यांमधून गर्व वाहतो आहे,मनामध्ये रागाने ठान मांडल आहे, दुःख झाल्यावर जे धायमोकलून रडतात, आनंदाच्या क्षणी जे प्रसन्नपणे हसतात,संकट चालुन आल्यावर ज्यांना भिती वाटते,अत्यंतिक प्रेम असलेल्या गोष्टींच्या संरक्षणासाठी जे दृढ निश्चयाने प्रेरित होतात अशाच व्यक्तींकडून सभोवतालच्या भव्यतेची निर्मीती झाली. त्या सर्वांनी आपल्या महत्वाकांक्षाना सातत्याने खतपाणी घातलं.बुध्दीच महत्व आहेच;कारण आपल्या भावना प्रकट करण्याचं साधन म्हणजे बुध्दी.माणसे जीवन ज्या प्रकारे व्यतीत कराव अशी ईश्वरेच्छा आहे त्याप्रमाणेच मी करेन, तरी देखील 'बुध्दी -शिर 'मी धारण करून राहेन 🙏 ईश्वरपद किंवा मोक्ष प्राप्त करणे हे माझ ध्येय नाही. माझ्या मते,ह्या दोन्हीही कल्पोकल्पित कथा आहेत. स्वर्गावर माझा विश्वास नाही. ह्या जगात ह्या जन्मात तुम्ही जाणीवपूर्वक ज्या गोष्टी नाकारता त्या तुम्हाला स्वर्गात प्राप्त होतात ह्यावर माझा विश्वास नाही. ह्या जन्मात मी जर सत्कर्म केल, *तर माझा पुढचा जन्म ब्राम्हणाचा असेल हे मला मान्य नाही. कारण माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. ब्राम्हण म्हणून जन्माला येणं हे जर सर्वात मोठं बक्षीस असेल,तर पुनर्जन्म टाळण्यासाठी मी मरणसुध्दा नाकारेन.माझ्या बोलण्याने तुम्ही कष्टी झाला आहात ह्याचा मला खेद वाटतो; परंतू मी एका व्यक्तीसायखा जगेन आणि एका व्यक्तीसारखाच मरेन मी ईश्वर होण्याचा प्रयत्न करणार नाही. माझ्या भावना मला जी वाट दाखवतील त्यावरून मी चालेन.पुढच्या पिढयांनी कित्ता गिरवावा असा आदर्श निर्माण करण्यात मला स्वारस्य नाही. माझं जीवन माझ्याबरोबर सुरू होऊन माझ्याबरोबरच संपेल. मात्र,हे जीवन मी समरसून जगेन आणि धिटाईने मृत्युला सामोरा जाईन.तुमचे शब्द उसने घेऊन मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी दहा शिरांचा माणूस म्हणून जगेन- मी दशानन होईन. हिच ती राजा रावणांची दहा डोकी आहेत. जय दशानन 👏 जय दशग्रिव्ह जय लंकेश वरील माहिती मी संदर्भ ग्रंथ(आसुर)मधुन संकलीत केली आहे. जय सेवा जय गोंडवाना 🙏Ravan

आपलाच 📒

laxman kannake ravan lekhakयेथे दाबा रावण हा गोंड राजाच होता

आणखी वाचण्यासाठी खाली दिलेली लिंक वर दाबा

एक टिप्पणी भेजें

1 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Please do not enter any spam link in the comment box.