मुन्दमुन्शुल सर्री (त्रेगुण्य शुल मार्ग) त्रिशूल मार्ग

मुन्दमुन्शुल सर्री (त्रेगुण्य शुल मार्ग) त्रिशूल मार्ग
Igondi

कोया वंशीय प्रत्येक गण्डजीवांच आपल्या सगा समुदायांची सेवा करणे, हर एक सगा गण्डजीवांच कर्तव्य आहे.सिंगार दीप चा प्रथम संभु (संभु -मुला) कोसोडूम यांनी जो पेन्कमेड़ी कोट चे कोटप्रमुख कुलीतुरा यांचा महाज्ञानी,योगसिध्द व शक्तीशाली पुत्र होता. त्यांनी आपल्या तपोबलाने समस्त प्राणिमात्रांच्या कल्याण साध्य करणे हेतु, मुन्दमुन्शुल सर्री (त्रिशुल मार्ग)त्रेगुण्यशूल मार्ग प्रतिपादित केला,आणी सिंगार दीप च्या सर्व गण्डजीवांची सेवा करण्याचा संदेश दिला.मुन्दमुन्शुल सर्री चे अनुसार गण्डजीवाच्या(मानवाच्या) शरीराचे मुख्य तिन अंग असतात.
Table of content

हे मानवी तिन अंग त्रिशूल मार्गाचे प्रतिक आहेत.त्रिशुल चा मध्य भाग विवेक अंग अर्थात बौध्दिक अंगाशी संबंधित आहे. उजवा भाग मानसिक अंगाशी व डावा भाग शारीरिक अंगाशी संबधीत आहे. त्यामुळे त्रिशूल मार्गाला गोंडी पुनेम व्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण मुल्य समजल्या जाते.प्रथम संभु यांनी प्रतिपादित केलेलेल्या मुन्दमुन्शुल सर्री Trishul marg नुसार,आपल्या बौध्दिक,मानसीक आणी शारीरिक अंगा च्या माध्यमातून कोणते कर्तव्य केले पाहिजे, याचा पाठ गोण्डी पुनेम मुठवा पोय पहांदी पारी कुपार लिंगो यांनी त्रिशूल मार्गाचे परिपाठ आपल्या शिष्यांना समजावून सांगतात ते खालील प्रमाणे होय.

मोद्दूर शुल विवेक अंग चे मार्ग

  • 1)सगा उपासना (सगा जोग)
  • 2)सगा चिंतन (सगा ताल्क)
  • 3)सगा निर्णय (सगा तय )
  • 4)सगा ज्ञान(सगा मोद)
सागा उपासना सागा चिंतन 
स्पष्टीकरण :-
कोयावंशीय हर एक गण्डजीवांनी(व्यक्तीनी) आपल्या मोद्दूर म्हणजेच विवेक अंगा च्या माध्यमातून सगा उपासना, सगा विचार मंथन,आणी आपल्या सगा समुदायातील सर्वांचे कल्याण होणारेच निर्णय व सगा सामाजिक ज्ञान साधना करून आपले सगां समुदायाचे कल्याण साध्य करुन घ्यावे.

मतीय शुल / मानसिक अंग

  • 1)सगा प्रेम (सगा मांड)
  • 2)सगा भाव (सगा सार)
  • 3)सगा संघ (सगा जुट )
  • 4)सगा सेवाभाव(सगा सेवा)
स्पष्टीकरण :-
कोयावंशीय हर एक गण्डजीवांनी(व्यक्तीनी) आपल्या मतीय म्हणजेच मानसिक अंगा च्या माध्यमातून नित्य सगा सामुदायिक प्रेम , सगा सामुदायिक भावना, सगा सामुदायिक एकता आणी सगा सामुदायिक सेवाभाव मनात असायला पाहिजे.

मेन्दोल शुल /शारीरिक अंग

  • 1)सगा कर्म (सगा कय)
  • 2)सगा कर्तव्य (सगा कयोम)
  • 3)सगा वाणी (सगा वन्क )
  • 4)सगा दृष्टी (सगा निंगा)
स्पष्टीकरण :-
कोयावंशीय हर एक गण्डजीवांनी(व्यक्तीनी) आपल्या मेन्दोल म्हणजेच शारीरिक अंगा च्या कर्मेद्रिंयाच्या माध्यमातून सामुदायिक कर्म , सगा सामुदायिक कर्तव्याचे पालन, सगा सामुदायिक वाणी चा वापर आणी सगा सामाजिक दृष्टीकोण ठेवून कार्य करावे .
वरील मुन्दमुन्शुल सर्री च्या मार्गाने प्रत्येक गोण्डीयन गण्डजीव आपल्या जिवनात आचरणात आणल्या सर्व प्राणिमात्रांचे कल्याण होईल व सर्वांच्या कल्याणातच प्रतेकाचे कल्याण आहे. हे उच्च कोटीचे गोंडी पुनेम दर्शन मुन्दमुन्शुल सर्री आहे,हे मोठवा पोय यांनी आपणास सांगीतलेले आहे. प्रत्येकाने याचा आपल्या जिवनात अंगीकार करावा
जय सेवा परंतु सर्व जिवांच्या कल्याण कारी हेतु सिंगारदीप चे प्रथम संभू (संभु-मुला) कोसोडूम प्रतिपादीत केलेल्या मुन्दमुन्शुल सर्री (त्रेगुण्यशुल मार्ग) यास आर्य लोक व आर्यवादी लोक हिन भावनेने तिन तिगाडा -काम बिगाडा, तीन तिप्पट-महा बिक्कट, दाडवणी तिन अस म्हणुन हिनवतात ते आपल्या गोंडी लोकांच्या कस लक्षात येत नसल 🤔 हे फार कठीण काम आहे. बस ईतकच

संकलण कनाके लक्ष्मण 7387299066

आणखी वाचण्यासाठी खाली दिलेली लिंक वर दाबा
Igondi

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ