गोंडीयण नाते संबधातील काही बारकावे
नातु आपल्या आजी सोबत थट्टा मस्करी करु शकतो, कारण आजी ही मातृसग्यातील असते, परंतु काको सोबत थट्टामस्करी करू शकत नाही,कारण काको आपल्या वडिलांच्या सग्यातील असते. नातु आणी दादा चा संबध भाऊ भाऊ चा संबंध येतो. आणी नातु आणी आजा हे थट्टा मस्करी करु शकतात, नातु आणी दादा चा संबध भाऊ भाऊ चा होत असल्यामुळे, वडील आपल्या मुलाला बाप म्हणतो व सुनेला माय म्हणतो. आणी आई आपल्या मुलाला सासरा मानते, त्याच प्रमाणे नात आपल्या आजी सोबत थट्टा मस्करी करु शकते, पण काको सोबत थट्टा मस्करी करु शकत नाही.
गोंडी संबंध बहिण भावाचा [brother and sister relationship]
कारण ती पितृसग्यातील कन्या असते. त्यांचा संबंध बहिणी बहीणी चा होतो. त्यामुळे च वडील आपल्या मुलीला सासु म्हणतो म्हणजेच मुलाचा व मुलीचा संबंध बहिण भावाचा असतो, व आई आपल्या मुलीला आई मानते. कारण तिचा विवाह मातृसग्यात होतो,पितृ सग्यात नाही. गोंडी समाजात बहिण आणी भावाच्या मुला मुलींचे विवाह होतात,कारण बहिण ही विषम सग्या मध्ये दिलेली असते,त्यामुळे दोन्ही ईवायी (पारी)थट्टा मस्करी करु शकतात.परंतु पाऱ्याड बाई (ईहीन)सोबत थट्टा मस्करी करु शकत नाही कारण ती आपल्या म्हणजे पितृसग्यातील असते.त्यांचा संबंध बहिण भावाचा असतो.
गोंडी संबध भाऊ भाऊ चा gondi relationship ,adivasi relationship rules
दादा आणी मुलाच्या मुलाचा संबध भाऊ भाऊ चा असतो परंतु मुलीच्या मुला सोबत थट्टामस्करी करू शकतो कारण तो त्याचा आजा (आक्को) होतो,म्हणजेच मुलगी विषम सग्यात लग्न झालेली असते. तसेच आजी आपल्या मुलाच्या मुला सोबत थट्टा मस्करी करु शकते, परंतु मुलीच्या मुला सोबत थट्टामस्करी करू शकत नाही,कारण मुलगी तीच्या पितृसग्यात लग्न झालेली असते, व त्यांचा संबध बहिण भावाचा होतो.
दादा व आजा(आक्को),आजी व काको,वडील व मामा आणी आई(अव्वाल) व मामी (आती) एक दुसर्या सोबत थट्टामस्करी करू शकतात कारण प्रतेकांचे सागा गोत्र हे सम विषम असतात. परंतु दादा आणी काको,आजी आणी आक्को, वडील व मामी(आती)आणी आई (अव्वाल)व मामा एक दुसऱ्या सोबत थट्टामस्करी करु शकत नाही कारण ते सम गोत्रांचे असल्यामुळे त्यांच्यात भाऊ बहिणी च नाते संबंध असतात.
जय सेवा सगाबिडार ता सेवा
🖋️ लक्ष्मण कनाके 7588424684
0 टिप्पणियाँ
Please do not enter any spam link in the comment box.